कोरस रुग्णालय कोविड बाधित गरोदर मातांसाठी सज्ज

महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या आदेशान्वये गरोदर महिलांना तातडीने उपचार मिळण्यासाठी उपायायोजना करण्यात आल्याचे सांगितले
कोरस रुग्णालय कोविड बाधित गरोदर मातांसाठी सज्ज

ठाणे महापालिकेचे वर्तकनगर येथील लोकमान्य कोरस रुग्णालय प्रसुतीगृह कोविड - १९ बाधित गरोदर मातांसाठी कोविड प्रसुतिगृह रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. या रूग्णालयात २० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या आदेशान्वये गरोदर महिलांना तातडीने उपचार मिळण्यासाठी उपायायोजना करण्यात आल्याचे सांगितले.

कोरोना कोविड -१९ चा प्रसार मोठया प्रमाणात होत असल्याने या आधी शासनाचे जिल्हा सामान्य रुग्णालय हे गरोदर मातांसाठी कोविड - १९ रुग्णालय म्हणून कार्यरत होते. परंतू सद्यस्थितीत सदर रुग्णालय गरोदर मातांसाठी कोविड- रुग्णालय म्हणून कार्यरत नसल्याने तसेच ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कोरोना या आजाराने बाधित गरोदर मातांसाठी सद्यस्थितीत कोव्हीड रुग्णालय असणे आवश्यक असल्याने तसेच सद्यस्थितीत कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या विचारात घेता गरोदर मातांच्या उपचाराच्या प्रयोजनार्थ ठाणे महानगरपालिकेचे लोकमान्य कोरस रुग्णालयात कार्यरत वर्तकनगर प्रसुतिगृह हे २० खाटांसाठी कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे.

सदर रुग्णालयात गरोदर मातांसाठीची बाहयरुग्ण तपासणी कार्यरत राहिल. तसेच जनरल ओपीडी चालू राहिल. कोविड आजार नसलेल्या गरोदर मातांना बाळंतपणासाठी ठाणे महानगरपालिकेच्या इतर प्रसुतिगृहात किंवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे संदर्भित करण्यात येईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in