उरणमध्ये खासगी जागेवरील अतिक्रमणांवर सिडकोची बुलडोझर कारवाई

सेक्टर ४६ मध्ये सिडकोने साडेबारा टक्के योजनेत वाटप केलेल्या प्लॉटवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते
उरणमध्ये खासगी जागेवरील अतिक्रमणांवर सिडकोची बुलडोझर कारवाई

सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी द्रोणागिरी नोड परिसरातील साडेबारा टक्के योजनेतील अनधिकृत टपऱ्या व चायनीजच्या दुकानावर गुरुवारी कारवाई करून ती बांधकामे उद्ध्वस्त केली. सिडकोचे अतिक्रमण विभागाचे एल. एच. डावरे यांच्या नेतृत्वाखाली सिडकोचे सुरक्षा रक्षक आणि पोलीस यांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

उरण जवळील द्रोणागिरी नोड-२ परिसरातील सेक्टर ४६ मध्ये सिडकोने साडेबारा टक्के योजनेत वाटप केलेल्या प्लॉटवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. यावेळी एक धाबा आणि १२ टपऱ्या यावेळी तोडण्यात आल्या. मात्र ही कारवाई बिल्डरांच्या हितासाठी केल्याचे बोलले जाते. खाजगी जागेत केलेले अतिक्रमण सिडकोने तोडले मात्र बाजूलाच लागून असलेल्या सिडकोच्या जागेवरील अनेक टपऱ्यांना मात्र हात लावला नाही. सिडकोच्या ज्या फुटपाथवर आणि मोकळ्या जागेवर बांधकामे केली आहेत ती का तोडली नाहीत असा सवाल आत्ता जनतेतून होत आहे. वास्तविक पाहता गुरुवारी पाडलेल्या अतिक्रमणांचा नागरिकांना कोणताही त्रास नव्हता. सरकारी जागेवरील बांधकामावर प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे दुकानदारांनामध्ये नाराजी पसरली आहे.

मात्र ज्या अतिक्रमणांचा नागरिकांना त्रास होतो ती मात्र जैसे थे असल्याने सिडकोच्या दुटप्पी धोरणावर संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत सिडकोचे अतिक्रमण विभागाचे एच. एल. डावरे यांच्याकडे विचारणा केली असता ज्या अतिक्रमणांच्या तक्रारी आम्हाला प्राप्त झाल्या होत्या त्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली आहे. लवकरच दुसरी अतिक्रमणे देखील पाडण्यात येतील.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in