मीरा-भाईंंदरमध्ये भाजपच्या दोन गटांत 'शिमगा'

भाजप प्रभारी जे. पी. ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांनी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते, त्यात माजी आमदार नरेंद्र मेहता व मीरा-भाईंदर विधानसभा निवडणूक प्रचार प्रमुख ॲड. रवी व्यास यांच्या गटात चांगलाच शिमगा झाला.
मीरा-भाईंंदरमध्ये भाजपच्या दोन गटांत 'शिमगा'

भाईंंदर : भाजप प्रभारी जे. पी. ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांनी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते, त्यात माजी आमदार नरेंद्र मेहता व मीरा-भाईंदर विधानसभा निवडणूक प्रचार प्रमुख ॲड. रवी व्यास यांच्या गटात चांगलाच शिमगा झाला. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापासून अपशब्द-दमदाटी, घोषणाबाजी व गोंधळ घालण्यात आला. मीरा-भाईंदर भाजपचे प्रभारी जे. पी. ठाकूर यांच्या उपस्थितीत जुना गोल्डन नेस्ट येथील ब्लू-मून क्लब येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत माजी आमदार नरेंद्र मेहता व रवी व्यास यांच्या गटातील त्यांचे समर्थक उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या वेळी मेहता समर्थक पदाधिकाऱ्याने जाणीवपूर्वक ॲड. रवी व्यास यांचा नामोल्लेख केला नाही. ॲड. व्यास यांचा उल्लेख करा सांगून देखील मेहता समर्थकाने नाव न घेत त्यांना डावलले म्हणून जाब विचारण्यास उठलेल्या व्यास समर्थकांना मेहता समर्थकांनी विरोध सुरू केला व व्यासपीठावर चढले.

त्यातच सुपर वॉरियर म्हणून काम केलेल्यांना डावलून मेहता समर्थकांची नावे घुसवल्याने त्यास व्यास गटाने आक्षेप घेतला. दोन्ही गटाचे पदाधिकारी-कार्यकर्ते आमने सामने आले आणि भिडले. त्यात काहींना धक्काबुक्की सुद्धा झाली. गुरूवारच्या या गोंधळाचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in