उल्हासनगरमध्ये साफसफाई अभियान

उल्हासनगरमध्ये साफसफाई अभियान

हे अभियान शहर स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे आयुक्त शेख यांनी सांगितले.

उल्हासनगर : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उल्हासनगरात कल्याण बदलापूर रस्त्यावरील साईबाबा मंदिर ते फार्व्हर लाईनपर्यंत हे डीप क्लीन स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

यावेळी महापालिका आयुक्त अजीज शेख, आमदार कुमार आयलानी यांच्यासह शहरांतील राजकीय नेते, महापालिका अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. धूळ, फूट पाथवरील कचरा आणि जंगली झाडे उचलण्यात आली आहेत. तसेच पाण्याच्या टँकरने संपूर्ण रस्ता स्वच्छ करण्यात आली. शहरात धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून त्यावरही महापालिका उपाययोजना करत असल्याचे महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी सांगितले. या स्वच्छता अभियानात कोणार्क कंपनीचे ३०० पेक्षा अधिक कर्मचारी, महापालिका कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते. हे अभियान शहर स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे आयुक्त शेख यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in