बोटींद्वारे तलावांची साफसाई! महापालिकेने घेतला नवीन बोटी खरेदीचा निर्णय

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ३७ तलाव असून तलावांच्या पाण्याची गुणवत्ता प्रदूषण नियंत्रण विभागातर्फे नियमितपणे तपासण्यात येते.
बोटींद्वारे तलावांची साफसाई! महापालिकेने घेतला नवीन बोटी खरेदीचा निर्णय

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ३७ तलाव असून तलावांच्या पाण्याची गुणवत्ता प्रदूषण नियंत्रण विभागातर्फे नियमितपणे तपासण्यात येते. सदर तलाव दाट रहिवासी वस्तीत असल्यामुळे रोजचे मनोरंजनाचे क्षेत्र तसेच सर्व प्रकारचे उत्सव तलाव परिसरात साजरे केले जातात, त्यामुळे तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माल्याचा कचरा पडतो. सर्व तलावाच्या बाजूने हरित क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पालापाचोळ्याचा कचरा तलावात पडतो. सदर कचरा नियमितपणे काढण्यासाठी ठाणे महापालिकेने बोटी खरेदीचा निर्णय घेतला आहे.

एकूण ३७ तलावांपैकी सद्यस्थितीत ९ तलावांवर बोट उपलब्ध आहे. अमृत तलाव योजनेंतर्गत ८ तलावांना बोट प्राप्त होणार आहे. तसेच राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेंतर्गत ५ तलावांना बोट प्राप्त होणार आहे. एकूण ३७ तलावांपैकी २१ तलावांना बोटी प्राप्त होणार आहे. तर उर्वरीत १६ तलावांना बोटीची आवश्यकता आहे. पंरतु काही तलावांच्या ठिकाणी बोटीची आवश्यकता नसल्यामुळे सद्यस्थितीतील ८ तलावांना बोटींची आवश्यकता आहे.

निविदा प्रक्रिया राबविण्यास आयुक्तांची मान्यता

तलाव साफसफाईसाठी निगा व देखभालीसह बोट व वल्हव व साफसफाई साहित्यासह तलाव बोट, झाडू, पंजा, सेफ्टी जॅकेट खरेदी करण्यासाठी पालिकेकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत. बाजारभावानुसार एका बोटीसाठी १,८०,६०० याप्रमाणे ८ बोटींसाठी १४,४४,८०० खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. सद्यस्थितीत प्रदूषण नियंत्रण विभागाकडे तलाव पुनरुज्जीवन व शुद्धीकरण या लेखाशिर्षकांतर्गत बजेट तरतूद उपलब्ध नसल्यामुळे हे काम तातडीचे असल्यामुळे निविदा प्रक्रिया राबविण्यास महापालिका आयुक्तांची मान्यता घेण्यात आली आहे.

महापालिकेतील तलाव

बोट उपलब्ध असलेले तलाव १. कौसा तलाव २. न्यू शिवाजी नगर तलाव ३. मखमली तलाव ४. उपवन तलाव ५. गांधीनगर तलाव (कमल तलाव) ६. खारेगाव तलाव ७. रेवाळे तलाव ८. कचराळी तलाव ९. कोलशेत तलाव अमृत तलाव योजनेंतर्गत बोटी

१. हरियाली तलाव २. ब्रह्माळा तलाव ३. रायलादेवी तलाव ४. दातिवली तलाव ५. आंबेघोसाळे तलाव ६. कमल तलाव ७. जोगिला तलाव ८. खिडकाळी तलाव

राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेंतर्गत बोटी

१. तुफेपाडा तलाव २. खर्डी तलाव

३. सिद्धेश्वर तलाव

logo
marathi.freepressjournal.in