उल्हासनगरमध्ये स्वच्छता मोहीम राबविणार

झाडांच्या बुंध्यांना चुन्याचा पांढरा रंग आणि गेरु पट्टे मारणे, रस्ता / पदपथ / दुभाजकलगतची अनावश्यक झाडे, झुडपे, गवत काढणे, प्रसिद्ध ठिकाणी बाजार पेठांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे.
उल्हासनगरमध्ये स्वच्छता मोहीम राबविणार
Published on

उल्हासनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र राज्य, यांनी संपूर्ण महाराष्ट्रात सखोल स्वच्छता (Deep Clean) मोहीम राबविण्याबाबत ऑनलाईन सूचना केल्या.

त्याअनुषंगाने आयुक्तांनी सोमवारी सकाळी सर्व विभाग प्रमुख यांची महा सभागृह हॉल येथे बैठक आयोजित करून सर्व विभाग प्रमुख यांना सखोल स्वच्छता मोहीम (Deep Clean) संपूर्ण शहरात राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. या अंतर्गत झाडांच्या बुंध्यांना चुन्याचा पांढरा रंग आणि गेरु पट्टे मारणे, रस्ता / पदपथ / दुभाजकलगतची अनावश्यक झाडे, झुडपे, गवत काढणे, प्रसिद्ध ठिकाणी बाजार पेठांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे. पदपथ (रस्त्यावरील खांबांची/ फलक/ दिशा दर्शकांची दुरुस्ती आणि रंगरंगोटी करणे. रस्त्यावरील खड्डे भरणे पट्टे मारणे, शौचालये, सौंदर्य प्रसाधनगृह यांची स्वच्छता, रंगरंगोटी करणे. रस्ते व पदपथावरील अतिक्रमण हटविणे, पार्क केलेल्या वाहनांखालील कचरा साफ करणे, बेवारस वाहने हटविणेदाट लोक वस्ती / गल्या बोळांतील स्वच्छता करणे,अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in