Dombivli : "पत्नी मारहाण करून घरातील सर्व सामान घेऊन गेली, पण पोलिसांनी..."; पतीची पोलीस आयुक्तांकडे फिर्याद

पत्नी व तिच्या सहकाऱ्यांविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या तरुणाला पोलिसांनी वाईट वागणूक दिल्याचे समोर आले आहे.
Dombivli : "पत्नी मारहाण करून घरातील सर्व सामान घेऊन गेली, पण पोलिसांनी..."; पतीची पोलीस आयुक्तांकडे फिर्याद

डोंबिवली : पत्नी व तिच्या सहकाऱ्यांविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या तरुणाला पोलिसांनी वाईट वागणूक दिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी वाईट वागणूक दिल्याबद्धल डोंबिवली पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी पाटील, बी. एन. पवार, पोलीस उपनिरीक्षक अडसूळ आणि सुभाष नलावडे यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी तरुणाने पोलीस आयुक्तांकडे केलेली आहे.

फिर्यादी विनोद गिलोट यांचे पत्नीसोबत वाद सुरू आहेत. ते गेल्या ३ महिन्यांपासून एकमेकांपासून वेगळे राहतात. २७ फेब्रुवारी रोजी गिलोट यांची पत्नी २५ ते ३० लोकांसह घरात घुसली, मारहाण करून घरातील सर्व सामान टेम्पोमधून घेऊन गेली. याबाबत २९ तारखेला पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज घेऊन गेलो असता पोलीस उपनिरिक्षक अडसूळ व कर्मचारी चव्हाण यांनी मला अरेरावी व शिवीगाळ करत तक्रार घेण्यास नकार दिला. तसेच मला ३ तास पोलीस ठाण्यात थांबवून ठेवले. त्यानंतर सतत विनंती केल्यानंतर माझा तक्रार अर्ज घेतला. दुसऱ्या दिवशी कर्मचारी चव्हाण आणि पीएसआय नलावडे यांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून घेत मला त्यावर सही करण्यास भाग पाडल्याचा आरोप गिलोट यांनी केला आहे.

गिलोट यांनी पोलिसांच्या या वागणुकीबाबत वकील अनिरुद्ध कुलकर्णी यांच्यामार्फत पोलीस आयुक्त, पोलीस उपयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याकडे रामनगर पोलीस ठाण्यातील पोलीसांविरुद्ध तक्रार केलेली आहे. याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांना विचारले असता त्यांनी चौकशी करून कारवाई करू असे सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in