डहाणू प्रकल्पाच्या नियोजन आढावा समितीच्या अध्यक्षपदी काॅंग्रेसचे नेते बळवंत गावित यांची नियुक्ती

डहाणू प्रकल्पाच्या नियोजन आढावा समितीच्या अध्यक्षपदी काॅंग्रेसचे नेते बळवंत गावित यांची नियुक्ती

राज्य शासनाने आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालय स्तरावरील नियोजन आढावा समित्यांच्या अध्यक्ष व अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या असून डहाणू प्रकल्पाच्या नियोजन आढावा समितीच्या अध्यक्षपदी काॅंग्रेसचे नेते बळवंत गावित यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यातील आदिवासी जिल्ह्यांतील ३० आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांच्या क्षेत्रातील आदिवासी उपयोजना क्षेत्रातील योजना व कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी प्रकल्पस्तरीय नियोजन व आढावा समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्यसरकारने जाहीर केला आहे. या समितीच्या माध्यमातून आदिवासी भागात राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्याला मदत होणार आहे. या समित्यांची घोषणा राज्यशासनाने केली असून डहाणू प्रकल्प कार्यालयाकरिता काॅंग्रेसचे नेते बळवंत गावित यांच्या अध्यक्षतेखाली घोषित झालेल्या समितीत कल्पना संजय खरपडे, योगेश नम, विश्वास वळवी, हरीश गावित यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in