काँग्रेस नेते मोईज शेख यांचा राजीनामा

पालघर जिल्ह्यातील काँग्रेस विनाशाला प्रदेश काँग्रेस आणि त्यातील काही खीसेभरू पदाधिकारी जवाबदार आहेत.
काँग्रेस नेते मोईज शेख यांचा राजीनामा

पालघर : ३५ वर्षांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले काँग्रेस नेते जिल्हा उपाध्यक्ष मोईज शेख यांनी आपल्या पक्षात सतत अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नेते बाळा थोरात, माजी मुख्य मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे राजीनामा देऊन रामराम ठोकला आहे. त्यामुळे मोईज शेख यांना इतर पक्षात संधी मिळेल असे चित्र आहे. परदेशातील नोकरी सोडून मोईज शेख यांनी काँग्रेस वाढवली पण त्यांच्याबाबत काँग्रेच्या वरिष्ठ नेत्यांकडून दूजाभाव केला जात होता. त्यांचे राजकीय खच्चीकरण करण्यात आल्याने अखेर त्यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा विचार केला असल्याचे त्यांनी सांगितले.

पालघर जिल्ह्यातील काँग्रेस विनाशाला प्रदेश काँग्रेस आणि त्यातील काही खीसेभरू पदाधिकारी जवाबदार आहेत. बळीराम जाधवांना सीट सोडली, त्याच वेळी काँग्रेस संपली. राहिलेली उरली सुरली आता २०२४ ला संपेल असे मोईज शेख यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in