कपिल पाटील यांच्याविरोधात कोण? भिवंडीच्या जागेसाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिल्लीत ठोकला तळ

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कपिल पाटील यांना उमेदवार जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडी या जागेवर कुणाला तिकीट देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कपिल पाटील यांच्याविरोधात कोण? भिवंडीच्या जागेसाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिल्लीत ठोकला तळ
कपिल पाटील यांचे संग्रहित छायाचित्र

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कपिल पाटील यांना उमेदवार जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडी या जागेवर कुणाला तिकीट देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भिवंडीची जागा आपल्याकडेच राहावी, या मागणीवर काँग्रेस पदाधिकारी ठाम असून त्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून त्यांनी दिल्लीत तळ ठोकला आहे.

केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उमेदवारीमुळे भाजपसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या भिवंडी लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीसाठी गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. भिवंडीची जागा मिळावी, अशी मागणी सुमारे दोन-तीन महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे. तर ही काँग्रेसची परंपरागत जागा असून आम्हीच लढवणार, अशी भूमिका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. या जागेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे, विद्यमान जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे व राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांची नावे पुढे येत आहेत.

दुसरीकडे भिवंडीच्या जागेसाठी काँग्रेसचे बदलापूर शहराध्यक्ष संजय जाधव तसेच भिवंडीतील काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून थेट दिल्लीत तळ ठोकला आहे. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, रमेश चेन्नीथला आदी नेत्यांची या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन भिवंडीच्या जागेची आग्रही मागणी केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in