कंटेनर पलटी होऊन आग; एकाचा मृत्यू

चितळसर पोलीस व वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त कंटेनर दोन हायड्राच्या साहाय्याने बाजूला करण्यात आला.
कंटेनर पलटी होऊन आग; एकाचा मृत्यू

ठाणे : पातलीपाडा येथे एक कंटेनर उलटल्याने त्यात आग लागल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. या घटनेत एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला.

शुक्रवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास हिरानंदानी पार्क समोर, पातलीपाडा, घोडबंदर रोड या ठिकाणी ठाणे कडून घोडबंदरकडे जाणाऱ्या वाहिनीवर कंटेनर पलटी होऊन अपघात झाला होता. या अपघातामुळे कंटेनरला आग लागली होती. या आगीत कंटेनरमधील एका व्यक्तीचा होरपळून जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दोन फायर वाहन, एक इमर्जन्सी टेंडर व एक रेस्क्यू वाहनासह उपस्थित झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी साडेतीन वाजेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले. या अपघातामुळे ठाण्याकडून घोडबंदरकडे जाणाऱ्या वाहिनीवर तब्बल तीन तास वाहतूककोंडी झाली होती. चितळसर पोलीस व वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त कंटेनर दोन हायड्राच्या साहाय्याने बाजूला करण्यात आला. त्यानंतर सदर रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.

logo
marathi.freepressjournal.in