बदलापूर प्रकरण: अन्य शिक्षण अधिकारी नेमण्यास कोर्टाची मनाई

बदलापूर शाळेतील दोन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी निलंबित शिक्षण अधिकारी बाळासाहेब रक्षे यांच्या जागी अन्य शिक्षण अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येऊ नयेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी दिले.
Mumbai High Court
संग्रहित चित्र
Published on

मुंबई : बदलापूर शाळेतील दोन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी निलंबित शिक्षण अधिकारी बाळासाहेब रक्षे यांच्या जागी अन्य शिक्षण अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येऊ नयेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी दिले.

राज्य सरकारने या घटनेनंतर ठाण्याचे शिक्षण अधिकारी बाळासाहेब रक्षे यांना राज्य प्रशासकीय लवाद मॅट यांच्या आदेशानुसार निलंबित केले होते. या निर्णयाला रक्षे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

न्यायमूर्ती ए एस चांदूरकर आणि न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठाने यावर सुनावणी करताना राज्य सरकारला रक्षे यांच्या जागी दुसऱ्या शिक्षणाधिकाऱ्याची नेमणूक न करण्याचे आदेश दिल. रक्षे यांनी आपले निलंबन रद्द करण्याची विनंती न्यायालयाला केली होती. त्यावर मात्र न्यायालयाने रक्षे यांना कोणताही दिलासा दिला नाही.

logo
marathi.freepressjournal.in