विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना; दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून कोयत्याने हल्ला

घरात हळद असल्याने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एका तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे.
 विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना; दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून कोयत्याने हल्ला

उल्हासनगर : उल्हासनगर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात हळद असल्याने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एका तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. उल्हासनगर कॅम्प ४ येथील बंजारा कॉलनी, रघुनाथ नगर, आशेळेपाडा येथे अनिल लोंढे यांच्या भावाच्या मुलीच्या हळदीचा कार्यक्रम होता. तेव्हा त्यांचा भाचा अमोल साबळे हा कपडे बदली करण्यासाठी घरी जात असताना वाटेत रुद्र आणि राज कनोजिया तसेच त्यांच्या अन्य साथीदारांनी पकडून घरात हळद असल्याने दारू पिण्यासाठी पैसे मागितले, तेव्हा अमोलने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या तरुणांनी अमोलवर कोयत्याने हल्ला केला. यावेळी अमोलच्या घरचे त्याला वाचवण्यासाठी गेले असता त्यांना देखील मारहाण करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in