हजारो लिटर दूध घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा; ५ लाख ७५ हजार हजारांचा अपहार

५ लाख ७५ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हजारो लिटर दूध घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा; ५ लाख ७५ हजार हजारांचा अपहार
PM

भाईंंदर : मीरारोडमध्ये हजारो लिटर दुधाची ऑर्डर घेऊन तसेच ते सांभाळण्यासाठी लागणारा खर्च असे मिळून ५ लाख ७५ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दूध विक्री कंपनीची फसवणूक करणारे आरोपी अमोल आरोटे व त्यांचे साथीदार साई राजेंद्र यादव (२५), आशिष सरबदेव यादव (२६) मुंबई यांनी आपसात संगनमत करून तक्रारदार व एशियन डेअरी फूड्स कंपनीचे संचालक प्रदीपकुमार मिश्रा यांच्या कंपनीकडून फसवणूक करण्याचे उद्देशाने दुधाची ऑर्डर देऊन, ऑर्डरप्रमाणे दूध मीरारोड पूर्व पूनमसागर येथील बालाजी मिल्क सेंटर (डेअरी) येथे व राधाकृष्ण डेअरी येथे खाली करून घेऊन एकूण ९९०१ लिटर दूध प्रतिलिटर ५८ रु. दराने व इतर हॅन्डलिंग चार्जेस असे एकूण ५ लाख ७५ रुपयांच्या दुधाचे बील न देता कंपनीची फसवणूक केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in