आयपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे गुन्ह्यांची उकल होणार सोपी, ठाणे महापालिकेच्या वतीने ३१ लाख ४१ हजारांचा निधी खर्च

शहरात घडणाऱ्या अपराधिक घटनांवर सूक्ष्म नजर ठेवण्यासाठी ठाण्यात ठिकठिकाणी आयपी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय ठाणे महापालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे.
आयपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे गुन्ह्यांची उकल होणार सोपी, ठाणे महापालिकेच्या वतीने ३१ लाख ४१ हजारांचा निधी खर्च

ठाणे : शहरात घडणाऱ्या अपराधिक घटनांवर सूक्ष्म नजर ठेवण्यासाठी ठाण्यात ठिकठिकाणी आयपी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय ठाणे महापालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. ठाण्यात यापूर्वीच मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. मात्र शहरात घडलेल्या एखाद्या गुन्ह्यांची उकल होण्यासाठी चांगल्या पद्धतीचे फुटेज मिळावे यासाठी अशाप्रकारचे कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने ३१ लाख ४१ हजारांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात नगरसेवक निधी आणि वायफायच्या बदल्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामध्ये नगरसेवक निधीतून व इतर माध्यमातून १५९८ आणि वायफायच्या माध्यमातून २५० कॅमेरे शहरात बसविण्यात आले आहेत. सप्टेंबर २०१७ पासून शहराच्या विविध भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. यातून महिलांची सुरक्षा तसेच सोनसाखळी चोरी, अपघात, आदींसह गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी हे कॅमेरे महत्त्वाचा दुवा ठरतील या उद्देशाने हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यानुसार नगरसेवक निधीतून १२०८ व इतर असे मिळून आतापर्यंत १,५९८ कॅमेरे बसविण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला आहे. तर दुसरीकडे वायफायच्या माध्यमातूनही २५० कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

प्रस्ताव आयुक्तांच्या पटलावर

पालिकेच्याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झालेल्या फुटेजचा फायदा गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलिसांना झाला असल्याचेही काही उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे ही सुविधा आणखी अद्ययावत करण्याच्या दृष्टिकोनातून शहरात ठिकठिकाणी आयपी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. यासाठी ३१ लाख ४१ हजारांचा खर्च करण्याचेही नियोजन पालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तो आयुक्तांच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.

आयपी कॅमेरे म्हणजे काय?

आयपी केमेरे अर्थात इंटरनेट प्रोटोकॉल कॅमेरा असा त्याचा अर्थ असून हा एक डिजिटल व्हिडीओ कॅमेरा आहे. सीसीटीव्ही मधील सर्व डेटा रिसिव्ह करून आयपी नेटवर्कच्या माध्यमातून ठाणे महापालिकेच्या हाजुरी येथील डेटा सेंटरला जोडण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in