डेज डान्सबारमध्ये व्हिडीओ काढल्याच्या रागातून ग्राहकांना मारहाण; मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या डान्सबारमध्ये आलेल्या काही ग्राहकांना व्हिडीओ काढल्याच्या रागातून बेदम मारहाण करण्यात आली
डेज डान्सबारमध्ये व्हिडीओ काढल्याच्या रागातून ग्राहकांना मारहाण; मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Published on

उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प नंबर ४ येथील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेला १०० डेज हा वादग्रस्त डान्सबार पुन्हा चर्चेत आला आहे. या डान्सबारमध्ये आलेल्या काही ग्राहकांना व्हिडीओ काढल्याच्या रागातून बेदम मारहाण करण्यात आली असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी मात्र या घटनेबाबत अनिभिज्ञ असल्याचे दिसून आले. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली असून या घटनेबाबत कोणताही गुन्हा अद्याप दाखल करण्यात आलेला नसल्याचे समोर आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in