डहाणू बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; ७ वर्षीय चिमुकलीवरील अत्याचाराचा निषेध

प्रजासत्ताक दिनी एका ७ वर्षीय चिमुकलीवर ७० वर्षीय व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याच्या निषेधार्थ आदिवासी एकता परिषदेच्या वतीने सोमवारी डहाणू शहरात पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
डहाणू बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; ७ वर्षीय चिमुकलीवरील अत्याचाराचा निषेध
Published on

पालघर : प्रजासत्ताक दिनी एका ७ वर्षीय चिमुकलीवर ७० वर्षीय व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याच्या निषेधार्थ आदिवासी एकता परिषदेच्या वतीने सोमवारी डहाणू शहरात पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी आक्रोश व निषेध मोर्चाचे आयोजन केले होते. या बंदमध्ये आदिवासी समाजासोबत इतर समाजही सहभागी झाला होता. व्यापारी वर्ग, फेरीवाले, रिक्षा युनियन यांनी आपले व्यवहार बंद ठेवून डहाणू बंदमध्ये सहभाग घेतला. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

बंदमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन विकास आघाडी, ऑल इंडिया एम्प्लॉईज फेडरेशन आणि इतर सामाजिक संघटनानी सहभाग नोंदवला. नरपड गावातील लोकांनी मोर्चाला आपल्या घरापासून सुरुवात केली. निषेध मोर्चाची सुरुवात इराणी रोड डहाणू येथून झाली. तारपा चौकात पोहचून मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.

आदिवासी समन्वय मंच भारतचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुनिल पऱ्हाड, केंद्रीय अध्यक्ष मंडळ सदस्य राजू पांढरा, केंद्रीय अध्यक्ष मंडळ सदस्य कीर्ती वरठा, जिल्हा सचिव प्रदीप ढाक, पालघर तालुका महिला संघटक मोहिनी खरपडे, ऑल इंडिया एम्प्लॉय फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष माधव लीलका, मनसे तालुका अध्यक्ष विपुल पटेल, यशोधन पाटील यांनी मोर्चाला मार्गदर्शन केले. पालघर जिल्हा सहसचिव पौर्णिमा परेड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

logo
marathi.freepressjournal.in