पालघरची धरणे भरली, वांद्रे धरण व कवडास धरण १०० टक्के भरले

गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये पालघर जिल्ह्यातील सूर्या धामणी व कवडास धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडल्याने वांद्रे व कवडा धरण काठोकाठ भरले आहे.
पालघरची धरणे भरली, वांद्रे धरण व कवडास धरण १०० टक्के भरले
Published on

संतोष पाटील/ वाडा:

गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये पालघर जिल्ह्यातील सूर्या धामणी व कवडास धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडल्याने वांद्रे व कवडा धरण काठोकाठ भरले आहे. तर धामणी धरण ७० टक्के भरले आहे. पालघर जिल्ह्यात आजपर्यंत पडलेल्या पावसामुळे धरणे भरल्याने पाणीटंचाईचे संकट दूर झाले आहे.

पालघर जिल्ह्यातील धामणी, कवडास, वांद्री ही प्रमुख धरणे असून मनोर, माहीम-केळवा, देवखोप, रायतळे, खांड, देवखोप आणि मोह खुर्द हे बंधारे आहेत. धामणी कवडास व बांद्री अशा तीन धरण मिळून ३२२.२४८ दलघमी क्षमता आहे. या धरणक्षेत्रात आतापर्यंत १५७० मिमी इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या तिन्ही धरणात आत्तापर्यंत २४६ दलघमी साठा झालेला आहे. यामध्ये वांद्रे धरण व कवडास धरण १००% भरलेले आहे.

पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांत सरासरी २६९१.९ मिमी पावसाची नोंद झाली होती. गेल्या तीन चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पालघर जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीतही वाढ झाली आहे. जिल्ह्यातील वैतरणा व पिंजाळ नद्या इशारा पातळी जवळ पोहोचले आहेत. वैतरणा नदीची सध्याची पाणी पातळी १००.७५ मीटर इतकी असून इशारा पातळी १०१.९० मीटर इतकी आहे तर पिंजाळ नदीची सध्याची पाणीपातळी १००.४५ मीटर इतकी आहे. या नदीची इशारा पातळी १०२.७५ मीटर आहे तर सूर्या नदी सद्यस्थितीत ६.५२ मीटरवर पोहोचली आहे, याची इशारा पातळी ११ मीटर इतकी आहे.

logo
marathi.freepressjournal.in