पालघरमधील दापोली गाव राज्य पर्यटनाच्या नकाशावर; गावात हिवरे बाजारच्या धर्तीवर आता वॉटर ऑडिट

दापोलीची लोकसंख्या सुमारे एक हजार आहे. हे गाव तीन विभागांत विभागले आहे. दापोली हे पालघरपासून जवळ असल्याने आणि इथला निसर्ग नितांत सुंदर असल्याने येथे पर्यटनाला वाव आहे, हे लक्षात घेऊन
पालघरमधील दापोली गाव राज्य पर्यटनाच्या नकाशावर; गावात हिवरे बाजारच्या धर्तीवर आता वॉटर ऑडिट

नितीन बोंबाडे /पालघर

पालघर जिल्ह्याच्या ठिकाणापासून अवघ्या पाच-सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या दापोली या गावाचा कायापालट करण्याचा ध्यास सरपंच हेमंत संखे यांनी घेतला असून, त्यांच्या या निर्णयाला ग्रामस्थांचाही तितकाच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या छोट्याशा गावात पर्यटन विकास तसेच अन्य कामांवर भर देण्यात आला आहे.

राज्य आदर्श गाव योजना प्रकल्प व संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार आणि भास्करराव पेरे-पाटील यांच्यासारख्यांना संखे हे कामांच्या बाबतीत आदर्श मानतात. गाव करील ते राव करील काय असे आपल्याकडे म्हटले जाते; परंतु याच गावाला सोबत घेऊन विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करता येते हे त्यांनी गेल्या काही दिवसापासून वेगवेगळ्या व्यासपीठावर सरपंचांना एकत्र आणून त्यांच्यासोबत गावातील प्रश्न आणि त्यावरील उपाययोजना याबाबत विचारविनिमय करून, विचारांचे आदानप्रदान केले जाते.

दापोली झाली अतिक्रमणमुक्त

संखे यांनी गावातील अतिक्रमणे आणि रहदारीतील अडथळे दूर करण्यासाठी मोहीम उघडली. या मोहिमेत त्यांना माजी जिल्हाप्रमुख वैभव संखे, उपसरपंच रोहित पिंपळे, ग्रामपंचायत सदस्य रचिता पाटील, पोलीस पाटील दौलत पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गणेश संखे, मंगेश पाटील,सूर्यकांत पाटील, विनोद संखे, वसंत संखे, किरण संखे, रोशन संखे, आदींनी चांगले सहकार्य केले. या मोहिमेदरम्यान गावातील लोकांनी उत्स्फूर्तपणे सहकार्य केल्यामुळे गाव अतिक्रमणमुक्त झाले आहे. कोणीही विरोध न करता स्वतः अतिक्रमणे काढण्यासाठी पुढे आले. आता अतिक्रमण काढण्यास सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचा सत्कार करण्याचा मानस सरपंच संखे यांनी व्यक्त केला.

पर्यटकांचे आकर्षण

या गावात मंदिरे, तलाव, जैव विविधतेने युक्त असे पक्षी निरीक्षणासाठीचे उत्तम ठिकाण, नारळ संशोधन केंद्राची बाग, कॅम्पिंग अशा विविध सुविधा आणि आकर्षण येथे आहेत. बाहेरच्या पर्यटकांना येथे आणून त्या माध्यमातून गावाला उत्पन्न कसे मिळेल, असा प्रयत्न सुरू आहे.

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी योजना

दापोलीची लोकसंख्या सुमारे एक हजार आहे. हे गाव तीन विभागांत विभागले आहे. दापोली हे पालघरपासून जवळ असल्याने आणि इथला निसर्ग नितांत सुंदर असल्याने येथे पर्यटनाला वाव आहे, हे लक्षात घेऊन हेमंत संखे यांनी दापोली या गावाला राज्याच्या पर्यटनाच्या नकाशावर आणण्याचे काम केले आहे. त्यासाठी मोठा निधी आणून त्यातून विविध कामे सुरू केली आहेत. गावासाठी निधी कुठून आणि कसा मिळवायचा याची त्यांना चांगलीच माहिती असल्याने त्याचा फायदा गावाला झाला आहे.

तीन कोटींच्या कामांना प्रारंभ

गेल्या महिन्यात संखे यांनी तीन कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना प्रारंभ केला. त्यात प्रमुख रस्ते, आंबेडकर नगर येथील स्मशानभूमी विसावा शेड तसेच या परिसरात पेपर ब्लॉक बसविणे, प्रवेशद्वार कमान, पंचम रोड अंतर्गत रस्ता कॉंंक्रीटीकरण, ग्रामपंचायत परिसरात पेवर ब्लॉक बसविणे आदींचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in