चोर असल्याच्या संशयाने केलेल्या मारहाणीत मृत्यू

नवघर पोलीस ठाणे हद्दीत सोमवारी पहाटे १च्या सुमारास भाईंदर पूर्वेच्या बी पी रोड येथील भाजी मार्केटमधील सार्वजनिक शौचालया जवळ एका अनोळखी व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडली होती.
चोर असल्याच्या संशयाने केलेल्या मारहाणीत मृत्यू

भाईंदर : नवघर पोलीस ठाणे हद्दीत सोमवारी पहाटे १च्या सुमारास भाईंदर पूर्वेच्या बी पी रोड येथील भाजी मार्केटमधील सार्वजनिक शौचालया जवळ एका अनोळखी व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडली होती. या घटनेची माहीती मिळताच नवघर पोलिसांनी तपास करून प्राथमिक माहिती नुसार त्या अज्ञात इसमाचा चोर असल्याच्या संशयाने मारहाणीत मृत्यू झाला असल्याचे समजले. या खुनाच्या गुन्ह्यातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

भाईंदर पूर्वेच्या भाजी मार्केटमध्ये सार्वजनिक शौचालयाजवळ एका अनोळखी व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडली होती. या घटनेची माहीती मिळताच नवघर पोलिसांनी गतीमान पध्दतीने तपास करून गुन्ह्याचे घटनास्थळावरील तसेच घटनास्थळाचे आजुबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासून त्याआधारे व तांत्रिक विश्लेषणाचे मदतीने आरोपीचा शोध घेवून खुनाच्या गुन्ह्यात ४ आरोपींना ६ तासांच्या आत अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे. आरोपींवर नवघर पोलीस ठाण्यात कलम ३०२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मयत इसम आरोपी राहत असल्याच्या ठिकाणी रात्री १च्या सुमारास गेल्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाला व त्यानंतर त्यांच्यात मारहाण सुरु होऊन त्याचा मृत्यू झाला आहे. मयत कोणत्या उद्देशाने रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी गेला होता, ते अध्याप स्पष्ट झालेले नाही; मात्र मिळालेल्या माहितीप्रमाणे मोबाईल चोरीच्या अनेकदा त्याठिकाणी घटना घडल्या आहेत व त्या दिवशी देखील त्याला मोबाईल चोरी करण्याच्या उद्देशाने आल्याचे समजून मारहाण करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in