आश्रमशाळेत शिकणाऱ्या मुलीचा जंतुसंसर्गामुळे मृत्यू

चिरनेर आश्रमशाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिक्षण घेणाऱ्या सृष्टी राजू शिद (९) या आदिवासी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
आश्रमशाळेत शिकणाऱ्या मुलीचा जंतुसंसर्गामुळे मृत्यू
Published on

उरण : चिरनेर आश्रमशाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिक्षण घेणाऱ्या सृष्टी राजू शिद (९) या आदिवासी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. जंतुसंसर्गामुळे सृष्टीचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.

उरण तालुक्यातील चिरनेर गावात श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ, वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर, संचलित, अनुदानित प्राथमिक आश्रमशाळा असून या शाळेत उरण, पनवेल तालुक्यासह इतर अशी एकूण २४० मुले शिक्षण घेत आहेत. गुरुवारी सकाळी सृष्टी शिद हिच्या छातीमध्ये दुखत असल्याबाबत विद्यार्थ्यांनी शाळेच्या शिक्षकांना सांगितले. शिक्षकांनी त्याची माहिती मुख्याध्यापक आप्पासाहेब मोरे यांना दिली असता त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोली येथील डॉक्टरांशी संपर्क साधला व सृष्टीच्या आजाराची माहिती दिली. त्यानंतर रुग्णालयांमध्ये नेले. मात्र तिच्यावर यशस्वी उपचार होऊ शकले नाहीत.

logo
marathi.freepressjournal.in