घोडबंदर येथील खड्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू

घोडबंदर रोड येथे ठाणेकडून मुंबईकडे जाणाऱ्या रोडवरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत
घोडबंदर येथील खड्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू

काजूपाडा, घोडबंदर रोड येथे ठाणेकडून मुंबईकडे जाणाऱ्या रोडवरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सदरच्या खड्ड्यांमुळे आज सुमारे ३.३० वाजताच्या सुमारास दुचाकीहून मुंबईकडे जाणाऱ्या एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ठाण्याकडून मुंबईकडे जात असताना खड्ड्यामध्ये दुचाकी गेल्याने तोल जाऊन सदरचा दुचाकीस्वार दुचाकीवरून रोडवरती पडला व त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बसच्या मागील चाकाखाली आल्याने सदर दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सदर घटनास्थळी वाहतूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in