श्री राम प्राणप्रतिष्ठापनानिमित्ताने ६५ मंदिरात दीपोत्सव

मंदिरे प्रभावी समाज केंद्रे करण्याबरोबरच मोठ्या मंदिरांकडून छोटी मंदिरे दत्तक घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
श्री राम प्राणप्रतिष्ठापनानिमित्ताने  ६५ मंदिरात दीपोत्सव

ठाणे : अयोध्येतील श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्ताने ठाणे शहरातील ६५ मंदिरांमध्ये दीपोत्सव व धार्मिक कार्यक्रमांचे दहा दिवस आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर मंदिरे प्रभावी समाज केंद्रे करण्याबरोबरच मोठ्या मंदिरांकडून छोटी मंदिरे दत्तक घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. विश्व हिंदू परिषदे अंतर्गत, 'मंदिर व अर्चक रोहित संपर्क आयाम'च्या वतीने ठाणे शहरातील मंदिर विश्वस्तांचे संमेलन जैन संघाच्या हॉलमध्ये रविवारी पार पडले. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला, असे विश्व हिंदू परिषदेचे ठाणे जिल्हा संयोजक सचिन मालवीय व सचिन म्हस्के यांनी सांगितले. या संमेलनाला मंदिर व अर्चक पुरोहित संपर्क आयामचे मुंबई क्षेत्रप्रमुख अनिल सांबरे, प्रांत मंत्री मोहन साळेकर, ठाणे विभाग मंत्री मनोज शर्मा, कौपिनेश्वर मंदिर कमिटी ट्रस्टचे सचिव रवींद्र विश्वनाथ उतेकर, ठाणे वर्धमान स्थानकवासी जैन संघाचे विश्वस्त चिमणभाई गाला, संपर्क आयामचे कोकण प्रांतप्रमुख राजकुमार भारद्वाज, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा अध्यक्ष भरतभाई सचदेवा आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in