वाहतूककोंडी टाळण्यासाठी प्रलंबित दोन उड्डाणपुलांच्या उभारणीला गती देण्याची मागणी

बदलापुरात वाढत्या लोकसंख्येप्रमाणे वाहनांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे
वाहतूककोंडी टाळण्यासाठी प्रलंबित दोन उड्डाणपुलांच्या उभारणीला गती देण्याची मागणी

बदलापुरात वाढत्या लोकसंख्येप्रमाणे वाहनांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शहराच्या पूर्व पश्चिम भागात वाहनाने प्रवास करण्यासाठी असलेल्या एकमेव उड्डाणपुलावर वाहतुकीचा भार वाढत असून वारंवार वाहनकोंडीची समस्याही उदभवत असते. ही समस्या दूर करण्यासाठी प्रलंबित असलेल्या दोन उड्डाणपुलांच्या उभारणीला गती द्यावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

बदलापुरात पूर्वी पूर्व-पश्चिम भागात जाण्यासाठी स्टेशन रेल्वे फाटक, बेलवली रेल्वे फाटक व सध्याच्या उड्डाणपूलाखालून जाणारा सबवे हे पर्याय होते. परंतु बदलापुरात पादचारी पुलाची उभारणी झाल्यानंतर ही दोन्ही रेल्वे फाटके बंद करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर बदलापूर पश्चिमेकडील जुनी पिलसी व चंद्रशेखर झा विद्यालय बॅरेज रोड ते होप इंडिया कंपनी दरम्यानचा उड्डाणपूल व वडवली नाका ते कार्मेल हायस्कूल समोरील जोडणारा रेल्वे उड्डाण पुल या उड्डाणपुलांची उभारणी करावी,अशी मागणी राम पातकर यांनी केली आहे. अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण शहर लगत असल्याने MH४३ हा राज्यमार्ग सुद्धा शहरातून जातो. बदलापूर पश्चिमे कडे अंदाजे ५६ गावातून पुणे व मुंबईला जाण्यासाठी हया उड्डाण पुलांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो.

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात या दोन्ही उड्डाणपूलांना प्रशासकीय व आर्थिक मंजुरी देण्यात आली होती. मात्र नंतरच्या सरकारने त्यास स्थगिती दिली. प्रलंबित राहिलेल्या या दोन्ही उड्डाणपुलाचे हाती घ्यावे,अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलीअसल्याचे राम पातकर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in