"दहिसरची धोकादायक इराणी मस्जिद पाडून टाका"

या मस्जिद परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास बसेस मधून लोक जात असल्याची माहिती समोर आली होती.
"दहिसरची धोकादायक इराणी मस्जिद पाडून टाका"

कल्याण : ठाणे, रायगड जिल्ह्याच्या सीमेवर आशिया खंडातील सर्वात मोठी इराणी मस्जिद बांधण्याचे काम १९९३ साली सुरू करण्यात आले होते. २५० एकर जागेत ही मस्जिद बांधण्यात येत होती; मात्र तात्कालीन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी या मस्जिदच काम थांबवले होते. त्यानंतर आता ही वास्तू जीर्ण झाली असल्याने तिचे स्ट्रक्चरल ऑडिट करून पाडण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे. पालकमंत्र्यांनी देखील तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मस्जिदचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ठाणे जिल्ह्यात आशिया खंडातील सर्वात मोठ्या इराणी मस्जिदचे काम नव्व्दच्या दशकात सुरू करण्यात आले होते. या मस्जिदच्या कामाला अनेक ठिकाणांहून आर्थिक पुरवठा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने काम देखील जलदगतीने सुरू होते; मात्र या मस्जिदला शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी विरोध केला होता. या मस्जिदच्या कामाला सन १९९५ साली ९९ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

मस्जिदचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना

मध्यंतरी या मस्जिद परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास बसेस मधून लोक जात असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे आता हे आंदोलन हाती घेतलेल्या पक्षांचे दोन गट तयार झाले असून, त्यांची न्यायालयात लढाई सुरू आहे. त्यामुळे या ज्वलंत प्रश्नाला आता मनसे आमदार राजू पाटील यांनी हात घातला असून, पालकमंत्री संभूराज देसाई यांच्याकडे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून तोडण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. यावर पालक मंत्र्यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतल्याने मस्जिद पाडकामाला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in