१५ लाख निधी देऊनही सावर्डे पुलाची वाहतूक अध्याप बंद

ग्रामस्थांना या पुलाचा केवळ हंगामी उपयोग झाला असुन आपत्कालीन परिस्थितीत या पुलाचा काडी मात्रही उपयोग होत नाही
१५ लाख निधी देऊनही सावर्डे पुलाची वाहतूक अध्याप बंद

वैतरणा नदीवरील सावर्डे ते दापोरा गावाना जोडणाऱ्या लोखंडी पुलाचे लोकार्पण ठाकरे यांच्या हस्ते २२ मे रोजी झाले. जिल्ह्यातील काही भाग दुर्गम क्षेत्रात येतो, अशा भागात पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत, या मध्ये रस्ते व आवश्यक असेल तेथे पूल बांधणे गरजेचे असल्यामुळे त्या- त्या भागात या सुविधा उपलब्ध करून देण्याचे अभिवचन ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार ठाकरे यांनी तब्बल १५ लाख रुपये निधी देऊन सावर्डे पुलाची निर्मिती करवून दिली आहे. मात्र, असे असले तरी येथील ग्रामस्थांना या पुलाचा केवळ हंगामी उपयोग झाला असुन आपत्कालीन परिस्थितीत या पुलाचा काडी मात्रही उपयोग होत नाही. आजमितीस या पुलाला जलसमाधी मिळालेली आहे. त्यामुळे येथून दापोरा, शिरोळ आदी ठिकाणी जाणाऱ्या विद्यार्थी व चाकरमान्यांचे दळण वळण खोळंबले आहे.

मोखाडा तालुक्यातील सावर्डे गावात जाण्या-येण्यासाठी केवळ लाकडी ओंडक्याच्या आधाराने जीव मुठीत घेऊन जावे लागत होते. त्यातून प्रसंगी आदिवासी बांधवाना प्राणही गमवावे लागले आहेत. तर अनेक पावसाळे विद्यार्थ्यांना शाळेला दांडी मारावी लागली आहे. ही बाब येथील सजग नागरिक व माजी सरपंच हनुमंत पादीर यांनी तत्कालीन परिस्थितीत समाज माध्यमावर पोट तिडकीने प्रसारित केली होती. परंतु, अशा प्रकारे तात्काळ केलेली पुलाची सुविधा ही तात्पुरती ठरली असून पावसाळ्यात या पुलावरून पुरुष दीड पुरुष पाणी वाहत असून दस्तूर खुद्द पादचारी पुलालाच जलसमाधी मिळाल्यामुळे किमान पावसाळ्यात तरी हा पूल सावर्डे वासियांसाठी कुचकामी ठरलेला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in