खडवली परिसरात वीज चोरांविरुद्ध धडक मोहिम सुुरु

वीज चोरी कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार मुरबाड पोलीस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला
 खडवली परिसरात वीज चोरांविरुद्ध धडक मोहिम  सुुरु
Published on

महावितरणच्या टिटवाळा उपविभागातील खडवली परिसरात वीज चोरांविरुद्ध धडक मोहिम राबवण्यात आली. या कारवाई २६ जणांकडून विजेचा चोरून वापर सुरू असल्याचे आढळून आले आहे. ३ लाख १५ हजार २९० रुपये किंमतीची २० हजार ३७५ युनिट वीज चोरुन वापरल्याप्रकरणी वीज चोरी कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार मुरबाड पोलीस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयराम शंकर, भोलेनाथ तिवारी, उमेश पाटाने, नाना जंगले, विजय शुक्ला, भैरु बोंबे, विजयपाल मौर्या, गुड्डु गुप्ता, अकबर अली अन्सारी, असलम खान, दिनानाथ प्रजापती, महेश प्रजापती, ध्यानसिंग यादव, अंजनीकुमार सिंग, पंकज कनोजिया, प्रकाश कोरी, श्रीराम मौर्या, सोनमती राजभर, मुख्तार सिंग, रामशंकर गौतम, सुरज तिवारी, गीता गुप्ता, राजेश मौर्या, विकास दुबे, उज्ज्वला दासगुप्ता, राजेश पटेल अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. उपविभागीय अभियंता गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता अलंकार म्हात्रे व त्यांच्या टिमने ही कारवाई केली. वीजचोरीच्या गुन्ह्यात जबर शिक्षा व दंडाची तरतूद असून कोणत्याही प्रकारे विजेचा अनधिकृत वापर करू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in