ठाणे जिल्हात धनगररत्न पुरस्कार सोहळा आयोजित

ठाणे जिल्हात धनगररत्न पुरस्कार सोहळा आयोजित
Published on

धनगर प्रतिष्ठान, ठाणे जिल्हा व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ यांच्या वतीने रविवार २९ मे रोजी धनगररत्न पुरस्कार सोहळा आयोजित केला आहे. यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या धनगर समाजातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

ठाण्यातील पाचपाखाडी येथील ठाणे महापालिकेच्या कै नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे रविवारी सायंकाळी या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. धनगर प्रतिष्ठान,ठाणे जिल्हा व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ, ठाणे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या सोहळ्याला नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, धनगर समाजाचे नेते खासदार विकास महात्मे, खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे आदी मान्यवर उपसि्थत असतील.

logo
marathi.freepressjournal.in