मुंबई-अहमदाबाद हायवेवर प्रथमच धनकुबेर यांचे मंदिर

कोकण पट्ट्यामध्ये ठाणे, पालघर, रायगड तसेच गुजरात जवळच्या जिल्ह्यात धनकुबेर यांचे मंदिर नसल्याने...
मुंबई-अहमदाबाद हायवेवर प्रथमच धनकुबेर यांचे मंदिर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद हायवेवर प्रथमच धनकुबेर यांच्या भव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अंबाधाम आश्रमाचे अध्यक्ष विनोद पारसनाथ सिंह यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी माता चामुंडा देवी, माता महाकाली, माता सरस्वती, श्री. खाटूराम यांची देखील प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

कोकण पट्ट्यामध्ये ठाणे, पालघर, रायगड तसेच गुजरात जवळच्या जिल्ह्यात धनकुबेर यांचे मंदिर नसल्याने मुंबई अहमदाबाद महामार्गावर भाविकांना दर्शन घेण्यासाठी धनकुबरे यांचे मंदिर असावे अशी इच्छा होती. पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर जवळ वाडा खडकोना येथ गोमातेश्वरी अंबाधाम आश्रम परिसरात धनकुबेर यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.

याप्रसंगी याप्रसंगी माजी आमदार आंनद ठाकूर, आ. अमित घोडा, डॉ. ओमप्रकाश दुबे, प्रकाश दुबे, हवालदार दुबे, विनोद पारसनाथ सिंग, मनोज सिंग, सुमित सिंग, विठ्ठल जोशी, हेमंत धर्ममेहेर, सुशील शहा, दिलीप सिंग, एस. मुलाणी, नितीन बोंबाडे, धनश्री केळशीकर, प्रशांत पाटील, पंडित चव्हाण, प्रदुम शर्मा, सुमित गुप्ता, जे. पी. यादव, बॉबी वाल्मिकी, सचिन विष्ट, विशाल मदेशिया, सचिन विष्ट, विजय सिंह, राध्ये, श्याम मदेशीया, आशिष सिंग, भरत कचरे, सर्वेश तिवारी आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in