गणेशोत्सवासाठी धर्मवीर एक्सप्रेस सोडण्यात यावी; कोकण रेल्वे प्रवाशी संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

गणेश चतुर्थी म्हणजे कोकणातील मोठा सण असुन जणु वार्षिक महोत्सवच असतो.
गणेशोत्सवासाठी धर्मवीर एक्सप्रेस सोडण्यात यावी; कोकण रेल्वे प्रवाशी संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कोरोनामुळे दोन वर्ष कोकणातील सण - उत्सवाच्या जल्लोषाला मुकलेल्या चाकरमान्यांना यंदा गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. ३१ ऑगस्ट रोजी गणेशोत्सव असल्याने तुलनेने गावी जाण्यासाठी यंदा भाविकांची मोठी झुंबड उडणार आहे. तर सर्वाधिक चाकरमानी ठाणे स्थानकातून प्रस्थान करण्याला प्राधान्य देतात. तेव्हा,धर्मवीर आनंद दिघे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातुन २९ ऑगस्टच्या मध्यरात्री 'ठाणे ते थिविम' अशी धर्मवीर एक्सप्रेस अनारक्षित गाडी सोडण्यात यावी. अशी आग्रही मागणी कोकण रेल्वे प्रवाशी सेवा संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गणेश चतुर्थी म्हणजे कोकणातील मोठा सण असुन जणु वार्षिक महोत्सवच असतो. या काळात चाकरमानी आपल्या मुळगावी संपूर्ण कुटुंबासह मिळेल, त्या वाहनाने जात असतात. कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून कोकणवासीय आपल्या गावच्या विविध सण-उत्सवांना मुकले होते. यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या आशा पल्लवीत झाल्या असुन कोविड प्रतिबंध नसल्याने चाकरमान्यांची अक्षरशः झुंबड उडण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in