डोंबिवली पश्चिमेला बसेस नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी

डोंबिवली पश्चिमेला परिवहन बसेस सुरू करावी, अशी मागणी असूनही परिवहन व्यवस्थापक याकडे का लक्ष देत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली
डोंबिवली पश्चिमेला बसेस नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी
PM

डोंबिवली : डोंबिवली शहरात रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचबरोबर डोंबिवली पश्चिमेला बसथांबा असतानाही बसेस धावत नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. करदात्या नागरिकांच्या पैशातून उभारलेले बसथांबे नावापुरतेच आहेत का? असा प्रश्न स्थानिकांकडून केला जात आहे.

डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशनबाहेरील गाळे जमीनदोस्त केल्यानंतर येथील जागा मोकळी झाली होती. २०१४ साली शिवसेनेचे भाऊसाहेब चौधरी हे परिवहन समितीचे सभापती असताना त्यांनी घाटकोपर स्टेशनबाहेरील बसथांबाप्रमाणे डोंबिवली पश्चिमेला स्टेशनबाहेर बसथांबा उभारला. काही दिवस बसथांब्यासमोर बसेस सुरू झाल्या. सायंकाळीच्या वेळी कामावरून येणाऱ्या नागरिकांनी बसला पसंती दिल्याने परिवहन सेवेतील तिजोरीत भर पडत होती. त्याचा फटका रिक्षाच्या व्यवसायाला बसल्याने रिक्षाचालकांमध्ये नाराजी पसरली होती. काही दिवसांनी येथील बससेवा अचानक बंद झाल्याने याचे कारण मात्र प्रवाशांना सांगण्यात आले नव्हते. तर पश्चिमेला स्टेशन ते गरीबाचा वाडा या मार्गावरही बससेवा सुरूचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. यावेळी राजकीय नेतेमंडळींनी बसच्या पहिल्या फेरीत प्रवासही केला होता. काही दिवसांनी या मार्गावरील बससेवाही बंद झाली.

डोंबिवली पश्चिमेला परिवहन बसेस सुरू करावी, अशी मागणी असूनही परिवहन व्यवस्थापक याकडे का लक्ष देत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केलीआहे. प्रवाशांची मागणी आणि परिवहनच्या महसुलीत वाढ या दोन्हीमुळे परिवहन व्यवस्थेला चांगले दिवस दिसतील असे असतानाही याचा विचार होत नसल्याचे दिसते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in