केरोसीन बंद करण्यात आल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय

आजच्या काळात अनेकांकडे गॅस सिलिंडर असले तरी, सिलिडरच्या वाढत्या दरामुळे महिला वळल्या आहेत.
केरोसीन बंद करण्यात आल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय

जव्हार तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाच्या दिवसांत विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढत आहे.जव्हारला डहाणू येथील गांजाड उपकेंद्रातून विद्युत पुरवठा होत असल्याने लांब अंतर आणि जंगल तथा डोंगराळ भागातून विद्युत पुरवठा गेल्याने कोणत्याही प्रकारे तांत्रिक अडचण झाल्यास संपूर्ण गावे अंधारात सापडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच सरकारी स्वस्त धान्य दुकानातून प्राप्त होणारे केरोसीनही बंद करण्यात आल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे.

आजच्या काळात अनेकांकडे गॅस सिलिंडर असले तरी, सिलिडरच्या वाढत्या दरामुळे महिला वळल्या आहेत. तसेच ग्रामीण भागात पुन्हा चुलीवरच्या स्वयंपाकाकडे रात्रीच्या सुमारास विजेचा खेळखंडोबा कायम राहतो. मात्र ग्रामीण भागात केरोसीनचा मोठा तुटवडा असल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे एका कुटुंबास राशन दुकानातून कमीत कमी ५ लीटर केरोसीन उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आहे.

सिलिंडरच्या सातत्याने वाढणाऱ्या दरामुळे ग्रामीण भागातील महिला पुन्हा चुलीकडे वळल्या आहेत. मात्र जळाऊ लाकडे पेटविण्यासाठी केरोसीनची नितांत गरज भासते. मात्र, केरोसीन देणे शासनाने बंद केले असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in