माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत पाठ्य पुस्तके व वह्यांचे वाटप

गेल्या दोन वर्षापासून श्री सिद्धिविनायक न्यास ट्रस्टच्या वतीने हजारो विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येत आहे
माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत पाठ्य पुस्तके व वह्यांचे वाटप

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कल्याण डोंबिवली मधील गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. विद्यालयातील पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. अकरावी ते पंधरावीच्या आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप ठाणे विभागीय महिला अध्यक्षा ऋता आव्हाड, कल्याण डोंबिवली जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. वंडार पाटील, सिद्धिविनायक न्यास मुंबईचे विश्वस्त सुनील पालवे, ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष सुधीर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या दोन वर्षापासून श्री सिद्धिविनायक न्यास ट्रस्टच्या वतीने हजारो विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येत आहे. तसेच पाठ्यपुस्तकांचे वाटप येथून पुढेही सुरु राहणार आहे.

याप्रसंगी ठाणे विभागीय अध्यक्षा ऋता आव्हाड, सिद्धिविनायक विश्वस्त सुनील पालवे, ठाणे युवक अध्यक्ष सुधीर पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच गरजू विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तके व वह्यांसाठी संपर्क साधावा असे आव्हान करण्यात आले.

कल्याण डोंबिवली युवक जिल्हाध्यक्ष राज मच्छिंद्र जोशी यांच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात मुंब्रा ब्लॉक अध्यक्षा वनिता भोर, युवक जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास आव्हाड, गोविंद सोनके, माधव पाटील, कल्याण ग्रामीण महिला अध्यक्ष उज्वला भोसले, बबीता राम, सपना धनगर, शबनम खान, नैना भणगे, सोनिया शहा, सारिका उदमले, युवक पदाधिकारी वैभव मोरे, संतोष जाधव, प्रसाद गायकवाड, भावेश सोनवणे, चंदन भदोरिया, नरेश वायले, सचिन कातकडे, दत्ता भोईर, हेमंत शिंदे, अभिजीत बाबर, अरुण शिंदे, संतोष वाढवे आधी युवक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कल्याण पूर्व विधानसभेतील सावळाराम महाराज महाविद्यालय ढोके येथील अकरावी व बारावी मधील आर्ट्स शाखेच्या शेकडो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व वह्या वाटप करण्यात आले. याप्रसंगी अंबरनाथ तालुका अध्यक्ष काशिनाथ पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सारिका गायकवाड, अंबरनाथ तालुका युवक अध्यक्ष विजय काठवले, अंबरनाथ तालुका युवक कार्याध्यक्ष कैलास शेंद्रे, अंकुश पाटील, प्रल्हाद पाटील, चंद्रकांत पाटील, उमेश वायले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in