दिवा शहरासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही-खा. श्रीकांत शिंदेंचे दिवा महोत्सवात प्रतिपादन

दिवा रेल्वे स्थानकातील होम प्लेटफार्म झाल्यावर दिवा ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल लोकल सेवा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले आहे.
दिवा शहरासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही-खा. श्रीकांत शिंदेंचे दिवा महोत्सवात प्रतिपादन

ठाणे : सलग पाच दिवस चालणाऱ्या दिवा महोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला असून अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली आहे. बुधवारी रात्री दिवा महोत्सवात खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थिती दर्शवली. यामध्ये त्यांनी दिवा शहराच्या विकासात कोणताही निधी कमी पडू देणार नसल्याचे प्रतिपादन केले. त्याचबरोबर दिवा शहराचा लवकरच कायापालट करणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. शिवसेनेच्या धर्मवीर मित्र मंडळ आयोजित यंदा १५ वा दिवा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून शेकडो ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, शेकडो यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार, अनेक शालेय स्पर्धा घेण्यात आल्या. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मोहत्सवात आपली उपस्थिती दर्शविली असून गेल्या दहा-पंधरा वर्षांच्या बदलणाऱ्या दिव्याची प्रशंसा केली असून भविष्यात दिवा शहरासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नसल्याचे स्पष्ट केले असून लवकरच दिवा रेल्वे स्थानकातील होम प्लेटफार्म झाल्यावर दिवा ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल लोकल सेवा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले आहे.

दिवा शहर प्रमुख रमाकांत मढवी यांच्या कामाची प्रशंसा केली असून सर्व माजी नगरसेकांच्या प्रभागातील सर्व कामासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सदर मोहत्सवाचे संयोजक रमाकांत दशरथ मढवी (मा. उपमहापौर), उपशहर प्रमुख शैलेश मनोहर पाटील, नगरसेविका दीपाली उमेश भगत, दर्शना चरणदास म्हात्रे, सुनिता गणेश मुंडे, नगरसेवक अमर पाटील, दीपक जाधव तसेच प्रमुख पदाधिकारी अर्चना निलेश पाटील, ॲड. आदेश भगत, गुरुनाथ पाटील, चरणदास म्हात्रे, शशिकांत पाटील, भालचंद्र भगत, निलेश म्हात्रे, शैलेश भगत, आदि पदाधिकारी अथक परिश्रम घेत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in