गॅस एजन्सी ग्राहकांकडून जास्त पैसे वसुल करतात ?

गॅस एजन्सी ग्राहकांकडून जास्त पैसे वसुल करतात  ?
Published on

देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत दररोज वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. त्यात पेणमध्ये वरधान गॅस एजन्सी येथील काही कर्मचारी ग्राहकांकडून १०० ते १५० रुपये प्रत्येक सिलिंडरमागे जास्त वसूल करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, पेणमधील ग्राहक वरधान गॅस एजन्सीमध्ये सिलिंडर घेण्यासाठी गेले असता सिलिंडर देण्यासाठी १५० रुपयांची मागणी तेथील कर्मचारी जसराज याने केली. सदर ग्राहकाने जास्त पैसे का घेताय, असे विचारले असता उद्धट उत्तरे जसराज याने दिली आणि सिलिंडरचे कार्ड आणले नाही त्याचे आम्ही जास्त पैसे घेतो, असे सांगितले.

महागाईने नागरिकांचे कंबरडे मोडले असतानाच जीवनावश्यक यादिंमध्ये मुख्य ठरलेल्या गॅस सिलिंडरचे भाव दर १५ दिवसांनी वाढत आहेत त्यातच हे कर्मचारी ग्राहकांकडून जास्तीचे आकारणी करत असल्याच्या अनेक तक्रारी येथील पत्रकारांकडे आल्या होत्या मात्र पुराव्याअभावी कोणीही आजपर्यंत कार्रवाई केली नाही. पण आज खुद्द एका पत्रकाराकडेच येथील कर्मचाऱ्याने जास्त पैशाची मागणी केल्याने त्याचा पुरावा या ग्राहकाने ठेवला आहे. त्या ग्राहकाने त्वरीत गॅस एजन्सीच्या मालकाकडे दूरध्वनीद्वारे तक्रार केली. ग्राहकांनी कोणत्याही वस्तूंची किमत शासनाने ठरवलेल्या किमतीपेक्षा जास्त देऊन आपली फसगत करून घेऊ नये, असे आवाहन पत्रकारांतर्फे सर्व नागरिकांना करण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in