महिला डॉक्टर मारहाण प्रकरण : नगरसेवक रमेश म्हात्रेला १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी; वैद्यकीय उपचाराची विनंती मान्य

डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेला शिवसेना नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवार १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
महिला डॉक्टर मारहाण प्रकरण : नगरसेवक रमेश म्हात्रेला १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी; वैद्यकीय उपचाराची विनंती मान्य
महिला डॉक्टर मारहाण प्रकरण : नगरसेवक रमेश म्हात्रेला १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी; वैद्यकीय उपचाराची विनंती मान्य
Published on

डोंबिवली : डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेला शिवसेना नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवार १३ जुलैपर्यंत    पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी म्हात्रे याच्यासह अन्य तीन आरोपींना शुक्रवारी दुपारच्या सुमारास न्यायालयात हजर केले. दरम्यान, म्हात्रे याच्या वकिलांनी दाखल केलेला वैद्यकीय उपचारांचा अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. अनेक वर्षांनंतर प्रथमच मारहाणप्रकरणी एका नगरसेवकाला पोलीस कोठडीत जावे लागले आहे.

शास्त्रीनगर रुग्णालयातील घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणी वेगाने कारवाई करत आरोपींना अटक केली. शुक्रवारी दुपारी रमेश म्हात्रे आणि या गुन्ह्यातील अन्य तीन आरोपी रमेश पवार, प्रकाश निकम आणि शरद कारंडे यांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. या तीन आरोपींची कोठडीची मुदत संपल्याने त्यांनाही न्यायालयात पोलिसांनी हजर केले होते. तपास पूर्ण करण्यासाठी पोलिसांनी आरोपींची पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने चारही आरोपींना १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

न्यायालयात या प्रकरणावर दोन्ही बाजूंच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला. फिर्यादी डॉक्टरांची बाजू सरकारी वकील अॅड. हड्सकर यांनी मांडली आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कोठडीची मागणी केली. तर नगरसेवक रमेश म्हात्रे    यांच्या वतीने अॅड. आनंद पत्की यांनी बाजू मांडली. इतर तीन आरोपींच्या वतीने (पवार, निकम, कारंडे) अॅड. गणेश पाटील यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.

महिला डॉक्टर मारहाण प्रकरण : नगरसेवक रमेश म्हात्रेला १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी; वैद्यकीय उपचाराची विनंती मान्य
महिला डॉक्टर मारहाण प्रकरण : शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना धक्का; १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

युक्तिवादादरम्यान रमेश म्हात्रे यांच्या वकिलांनी त्यांचे वय आणि ढासळत्या आरोग्याचा हवाला देत न्यायालयात वैद्यकीय उपचारांसाठी अर्ज केला होता. न्यायालयाने हा अर्ज अटींसह मंजूर केला. म्हात्रे यांचे नगरसेवक पद शासनाने तातडीने रद्द करावे, अशी डॉक्टर, वैद्यकीय संघटना, नागरिक, परिचारिकांची मागणी आहे. त्यावर मात्र निर्णय झालेला नाही.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in