
डोंबिवली येथील आदिनाथनगरमध्ये तीन मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घडना घडली आहे. विशेष म्हणजे महापालिकेने ही इमारत धोकादायक असल्याची नोटीस दिली होती. ढिगाऱ्याखाली दोन जण अडकले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्याला सुरुवात करण्यात आली आहे.
कोसळलेली इमारत ही धोकादायक इमारतींच्या यादीत होती. सकाळपासूनच ही इमारत खाली करण्याचं काम सुरु होतं. हे काम सुरु असताचाना पाच वाजेच्या सु्मारास ही इमारत कोसळली. सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेकडील जूना आयरे रोड येथील आदिनारायण तळमजला येथील तीन मजली इमारत कोसळली. यात दोन जण अडकल्याचं सांगितलं जात आहे. ही धोकादायक होती. तसंच इमारत खाली करण्याचं काम सुरु होतं, याचं वेळी ही दुर्घटना घडली. सात ते आठ खोल्या असलेल्या या इमारतीतील बहुतांश लोकांनी आपली रुम खाली केली होती. पण दोघे जण मात्र याच ठिकाणी वास्तवाला होते, असं सांगितलं जात आहे.