महाराष्ट्रात सीबीएसई मधून डोंबिवलीची दिक्षा सुवर्णाला 99.6 टक्के

होली एंजल्स संस्थेचे अध्यक्ष डॉ.ओमन डेव्हिड यांच्या मार्गदर्शनाखाली गेले कित्येक वर्ष 100% रिझल्ट चा वारसा
महाराष्ट्रात सीबीएसई मधून डोंबिवलीची दिक्षा सुवर्णाला 99.6 टक्के

महाराष्ट्रात 2021-22 सीबीएसई मधून डोंबिवलीची दिक्षा सुवर्णा प्रथम 99.6 टक्के गुण मिळवून महाराष्ट्रातूनच पहिली आली आहे. डोंबिवलीतील होली एंजल्स शाळेतून शिकलेल्या दीक्षाचा शाळेत विद्यार्थी व पालकांच्या उपस्थिती सत्कार करण्यात आला.

होली एंजल्स संस्थेचे अध्यक्ष डॉ.ओमन डेव्हिड यांच्या मार्गदर्शनाखाली गेले कित्येक वर्ष 100% रिझल्ट चा वारसा संस्था चालवत आली आहे. या इतिहासात आता 'दीक्षा सुवर्णा' हे नाव सुवर्ण अक्षरात कोरले गेले आहे. त्याचबरोबर याच शाळेतील विद्यार्थी अनुश्री मनीष खिस्ती, रुचिता विनय दीक्षित, निहारिका मंदार पवार यांचाही सत्कार करून सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य बिजॉय ओमन, संचालक डॉ. ओमेन डेव्हिड, मॅनेजिंग ट्रस्टी, श्रीमती लीला ओमन, मुख्याध्यापिका रफत शेख आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दीक्षा सुवर्णा म्हणाली, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या यशामागे त्याचे स्वतःचे प्रयत्न त्याच्या आई-वडिलांचे व शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच तो शिकत असलेल्या शैक्षणिक संस्थेचाही मोठा वाटा असतो. प्राचार्य बिजॉय ओमन, संचालक डॉ. ओमेन डेव्हिड म्हणाले, होली एंजल्स संस्थेने नेहमीच प्रयत्नशील गुणी हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना योग्य मार्गदर्शन देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे, त्याचेच फलित म्हणून आज या शिक्षण संस्थेतून बाहेर पडणारे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांचे हे यश होली एंजल्स संस्थेसाठी तसेच संस्थेतील सर्व शिक्षकांसाठी अत्यंत गौरवाची बाब आहे, मुळातच अतिशय शांत व अभ्यासू वृत्तीच्या दीक्षा कडे अभ्यासास पूरक असे सारे पुढे गुण होते पण त्याचबरोबर उत्तम कथ्थक नृत्य चित्रकला यातही ती पारंगत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in