

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेकडील स्थानकाबाहेरील परिसर हा अनेक वर्षं फेरीवालामुक्त आहे. मात्र डोंबिवली पश्चिम पादचारी पुलावर मात्र भिकारी, गर्दुल्ले आणि फेरीवाले बसत असल्याने मंगळवारी पालिका प्रशासनाने करावाई केली. कारवाई सुरू असताना फेरीवाल्यांनी पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्या फेरीवाल्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता इतर फेरीवाल्यांनी पोलिसांशी वाद घातला. यामुळे काही काळ वातावरण तंग झाले होते.
डोंबिवली पश्चिमेकडील स्थानकाबाहेरील परिसर फेरीवाला मुक्त करण्यास माजी नगरसेवक शैलेश धात्रक व मनीषा धात्रक यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले तर पालिकेचा 'ह' प्रभाग क्षेत्र पथकप्रमुख विजय भोईर यांनी अनेक वर्ष स्थानकाबाहेरील परिसरात फेरीवाले बसणार नाही याकरता लक्ष ठेवले. डोंबिवली पश्चिमेला स्टेशनलगत पादचारी पुलावर गर्दुल्ले, भिकारी बसतात. मंगळवारी तारखेला सहाय्यक आयुक्त अभिमान पवार, पथकप्रमुख विजय भोईर आणि कर्मचारी यांनी पादचारी पुलावर कारवाई केली.
पादचारी पुलावर फेरीवाल्यांनी कारवाई सुरू असताना पाहून एका फेरीवाल्यांनी पोलिसांशी वाद केला. मात्र, यावेळी पोलीस कर्मचारी खूप संतापले. पोलिसांनी त्या फेरीवाल्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता इतर फेरीवाल्यांनी त्याला पकडू नये म्हणून पोलिसांशी वाद घातला. कारवाईत भिकारी व गर्दुल्ले यांना पादचारी पुलावरून हाकलून देण्यात आले. फेरीवाल्यांचा माल तर जप्त करण्यात आला.