
गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास डोंबिवली (Dombivli) पूर्वेकडील मानपाडा रोडवरील राजलक्ष्मी आर्ट ज्वेलर्स दुकानात चोरीचा करण्याचा प्रयत्न झाला. डोंबिवलीत दोन दिवसातील ही तिसरी घटना आहे. बाजूच्या बंद दुकानाच्या गाळयातून चोरट्याने भिंत तोडून ज्वेलर्स दुकानात शिरण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा प्रयत्न असफल ठरला. यासंदर्भात टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवली ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष सागरमल जैन आणि उपाध्यक्ष सुरेश सोनी यांनी डोंबिवलीतील ज्वेलर्स दुकान सुरक्षित नसल्याचे सांगितले.