Dombivli : गळ्याला कोयता लावून Ola कॅब चालकाला लुटले, गुंडाला पोलिसांनी केली अटक

अद्वेत विनायक शिंदे (२८) असे अटक केलेल्या गुंडांचे नाव आहे.
Dombivli : गळ्याला कोयता लावून Ola कॅब चालकाला लुटले, गुंडाला पोलिसांनी केली अटक

डोंबिवली : प्रवासी भाडे मिळण्याची प्रतीक्षा करत असताना एका गुंडाने ओला कॅब चालकाच्या गळ्याला कोयता लावून धमकी देत लुटल्याची घटना रविवारी डोंबिवली पूर्वेकडील शिवमंदिर रोडवर घडली. या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलिसांनी एका गुंडाला अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अद्वेत विनायक शिंदे (२८) असे अटक केलेल्या गुंडांचे नाव आहे. ओला कॅबचालक सुफ इसा मन्सुरी यांच्या फिर्यादीवरून या गुंडाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील शिवमंदिर रोडवरील रामपंचायतन सोसायटीसमोरील रस्त्यावर प्रवासी भाडे मिळण्यासाठी वाट पाहत होते. कोयता घेऊन अद्वेतने चालकाला धमकावत त्यांच्याकडील मोबाईल आणि रोख, असे एकूण २१,५०० रुपये लुटले. चालकाने घाबरून आरडाओरड केल्यावर आजूबाजूला नागरिक जमा झाले. नागरिकांनाही अद्वेतने कोयत्याचा धाक दाखविला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

logo
marathi.freepressjournal.in