रिक्षा-कारच्या धडकेनंतर डोंबिवलीत रिक्षा चालकाची आत्महत्त्या; नुकसानभरपाईच्या मागणीने घेतला बळी- कुटुंबियांचा दावा

डोंबिवली मोठा गाव परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. ६७ वर्षीय रिक्षाचालक मुंजाजी शेळके यांनी मानसिक तणावामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली. ही आत्महत्या एका अपघातानंतर कारचालकाकडून झालेल्या बेदम मारहाणीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
रिक्षा-कारच्या धडकेनंतर डोंबिवलीत
रिक्षा चालकाची आत्महत्त्या; नुकसानभरपाईच्या मागणीने घेतला बळी- कुटुंबियांचा दावा
Published on

डोंबिवली : डोंबिवली मोठा गाव परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. ६७ वर्षीय रिक्षाचालक मुंजाजी शेळके यांनी मानसिक तणावामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली. ही आत्महत्या एका अपघातानंतर कारचालकाकडून झालेल्या बेदम मारहाणीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. यासंदर्भात विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश एकनाथ म्हात्रे या कारचालकाने रिक्षा व कार यांच्यात झालेल्या धडकेनंतर मुंजाजी शेळके यांना जबरदस्तीने ताब्यात घेत डांबून ठेवले आणि त्यांना बेदम मारहाण केली. तसेच त्यांची रिक्षाही जप्त केली. इतकेच नव्हे तर त्यांनी १० हजार रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली. मारहाणीनंतर रात्री ३ वाजता शेळके यांची सुटका झाली, मात्र त्या मानसिक धक्क्यातून सावरण्यात ते अपयशी ठरले. शेवटी त्यांनी घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले.

शेळके यांच्या नातेवाईकांनी यास कारचालकाच्या धमक्या व मानसिक छळाला कारणीभूत ठरवले असून, त्यांनी डोंबिवलीतील विष्णू नगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा ठाम इशारा नातेवाईकांनी दिला आहे. या घटनेने रिक्षा चालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, विष्णू नगर पोलीस ठाण्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारचालक आकाश म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in