डोंबिवलीतील धक्कादायक घटना; २२ वर्षीय तरुणीवर तीन रिक्षाचालकांचा लैंगिक अत्याचार

चेतन चौहान, हेमंत चौहान, उमेश वर्मा अशी अटक केलेल्या रिक्षाचालकांची नावे आहेत.
डोंबिवलीतील धक्कादायक घटना; २२ वर्षीय तरुणीवर तीन रिक्षाचालकांचा लैंगिक अत्याचार
Published on

डोंबिवली : येथील २२ वर्षीय तरुणीवर तीन रिक्षाचालकांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघा आरोपींना अटक केली आहे.

चेतन चौहान, हेमंत चौहान आणि उमेश वर्मा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित तरुणी एका सुरक्षा रक्षक एजन्सीत कार्यरत आहे. आरोपी हे तिच्या ओळखीचे असल्याची माहिती समोर आली आहे.

पार्टीच्या बहाण्याने बोलावले

ओळखीचा गैरफायदा घेत आरोपींनी तरुणीला पार्टीच्या बहाण्याने खंबाळपाडा येथील एका फ्लॅटवर बोलावले. पार्टी संपल्यानंतर तिघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केल्याचा आरोप आहे.

तक्रारीनंतर तातडीने कारवाई

घटनेनंतर पीडित तरुणीने टिळकनगर पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ कारवाई करत काही तासांतच तिघा आरोपींना अटक केली.

या प्रकरणी भारतीय न्यायसंहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in