Dombivli : कॉलेजजवळ अमली पदार्थांची विक्री; विद्यार्थ्याला ओव्हरडोस; मुलाच्या वडिलांची रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार

डोंबिवली पूर्वेकडील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्याला अमली पदार्थांचा ओव्हरडोस झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी ड्रग्ज विक्री करणाऱ्यांविरोधात डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Dombivli : कॉलेजजवळ अमली पदार्थांची विक्री; विद्यार्थ्याला ओव्हरडोस; मुलाच्या वडिलांची रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार
Dombivli : कॉलेजजवळ अमली पदार्थांची विक्री; विद्यार्थ्याला ओव्हरडोस; मुलाच्या वडिलांची रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्याला अमली पदार्थांचा ओव्हरडोस झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी ड्रग्ज विक्री करणाऱ्यांविरोधात डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शैक्षणिक संस्थांच्या परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

संबंधित विद्यार्थी अचानक आजारी पडल्याने त्याला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीदरम्यान त्याने अमली पदार्थांचा ओव्हरडोस घेतल्याचे समोर आले. या घटनेनंतर त्याची प्रकृती खालावली आणि तो १२ तासांहून अधिक काळ बेशुद्ध होता.

या घटनेमुळे व्यथित झालेल्या विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिसांकडे धाव घेतली. मात्र, वारंवार रामनगर पोलीस ठाणे आणि गुन्हे अन्वेषण शाखेच्या फेऱ्या मारूनही अपेक्षित मदत मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in