
डोंबिवली : ऊसाचा रस काढणाऱ्या मशिनमध्ये तेथे काम करणाऱ्या एका तरुणाचा उजवा हात अडकल्याची घटना बुधवारी डोंबिवली पूर्वेकडील मिलापनगर परिसरात सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळल्यानंतर घटनास्थळी पोहोचले. त्याआधी तेथील नागरिकांनी शर्तीचे प्रयत्न करून कामगाराच्या हात मशीन मधून बाहेर काढला.
पालिकेची कोणतेही परवानगी नसताना आणि नियमाचे पालन न करता डोंबिवली पूर्वेकडील मिलापनगर मधील रस्त्याच्या एका बाजूला गजानन बबकर हे अनेक महिन्यापासून ऊसाचा रस विक्री करत आहेत. त्यांच्याकडे काम करत असलेला सूरज मोरे हा उसाचा रस काढत असताना त्याचा उजवा हात मनगटापर्यंत मशिनमध्ये अडकला. यात कामगाराच्या हाताची बोटेही जखमी झाली. आजूबाजूकडील नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून कामगाराचा हात बाहेर काढला. जखमी कामगाराला रुग्णालयाला दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते.
दरम्यान, कुठल्याही ठिकाणी अशा प्रकारे आपले बस्तान बसवून कोणतेही नियम न पाळता फेरीवाले बसतात. मिलापनगर परीसरात ऊसवाले, वडापाव, भुर्जीपाववाले बसतात. विशेष म्हणजे उघड्यावर गॅस सिलेंडरचा वापर केला जातो. पालिका प्रशासनाचे याकडे लक्ष नाहीये, त्यामुळे या घटनेतील ऊसविक्री करणाऱ्या मालकावर पालिका प्रशासन काही कारवाई करणार का याकडे लक्ष लागले आहे.