नीट 2023 राष्ट्रीय स्तर वैद्यकीय प्रवेश परीक्षेत डोंबिवलीकर अव्वल

694 गुण मिळवणाऱ्या श्रेयसीवर कौतुकाचा वर्षाव
नीट 2023 राष्ट्रीय स्तर वैद्यकीय प्रवेश परीक्षेत  डोंबिवलीकर अव्वल

डोंबिवली : देशपातळीवर पार पडलेल्या नीट 2023 चा निकाल १४ मे जाहीर झाला. देशभरातून या परीक्षेला २० लाखाहून अधिक विद्यार्थी बसले होते. या परीक्षेत डोंबिवलीकर श्रेयसी दुर्वे या विद्यार्थिनीने ७२० पैकी ६९४ गुण मिळवून एक नवीन उच्चांक केला आहे. श्रेयसीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पाटकर विद्यालयातून शालेय शिक्षण घेतलेल्या श्रेयसी दुर्वे हीने नीट परीक्षेचीची तयारी एलियन करिअर इन्स्टिट्यूटच्या डोंबिवली शाखेतून केली. त्याचप्रमाणे सुजल प्रजापती - ६५१/७२०, मीत नारखेडे -६२९/७२० व विशाल चौधरी - ६२४/७२० यांनी ही उत्तम कामगिरी करून या परीक्षेत एक वेगळा ठसा उमटविला आहे.डोंबिवलीतील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचा कौतुक सोहळा एलियन करिअर इन्स्टिट्यूटमध्ये संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांच्या आईवडिलांसह शिक्षकवृंद उपस्थित होते.

या यशाबाबत श्रेयशी म्हणाली,मला खूप आनंद होत आहे, दोन वर्षांपासून खूप मेहनत घेतली होती. आता डॉक्टर होण्याचे स्वप्न या परीक्षेत मिळालेल्या यशामुळे पूर्ण होईल. शिक्षकांनी जसे सांगितले त्याच पद्धतीने अभ्यास केला. सर्व प्रकारच्या परीक्षा एलियन मध्ये छान घेतल्या होत्या. स्वतःवर आत्मविश्वास ठेवा, शिक्षकांनी सांगितलेलं ऐकून अभ्यास करा असा संदेश तिने विद्यार्थ्यांना दिला आहे. पुढे डॉक्टर होऊन डोंबिवलीकरांची सेवा करणार असेही तिने सांगितले.तर एलियन करिअर इन्स्टिट्यूटचे गणेश देसाई म्हणाले, ही स्पर्धा परीक्षा आहे, काही हजार मुलांनाच एमबीबीएससाठी प्रवेश मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवणे, परीक्षा घेणे आणि त्यांचे मनोधैर्य कायम ठेवणे यासाठी शिक्षक काळजी घेत असतात. त्यामुळेच चांगलं यश विद्यार्थ्यांना मिळाले आहे. डोंबिवलीतील मुले राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत यशस्वी होत आहेत. वैद्यकीय कोर्सेससाठी नीट ही राष्ट्रीय परीक्षा होत असते.

श्रेयसीच्या अभ्यासाचे गुपित...

श्रेयसी ही रॉयल महाविद्यालयाची विद्यार्थीनी आहे. तिने महाविद्यालया समवेतच ॲलन या इन्स्टिट्युट मध्ये प्रवेश घेतला होता. त्यानंतर अभ्यास करताना श्रेयसीने सुरुवातीला दोन तास त्यानंतर चार तास आणि परीक्षेच्या काही महिने आधी तिने जवळपास 10 तास अभ्यास केल्याचे सांगितले. अत्यंत प्रामाणिकपणे अभ्यास केला असून घोकमपट्टी न करता मी संज्ञा समजून घेण्याकडे अधिक भर दिला. जोपर्यंत मला एखादी संज्ञा पूर्ण समजत नसे तोपर्यंत मी जागेवरून उठत नसे, असे ती सांगते. अभ्यासात सातत्य ठेवले की परीक्षेच्या शेवटी कोणताही त्रास होत नाही असे तिने नमूद केले आहे.

समाज मध्यामांपासून दूर

संपूर्ण वर्षभरात मी टीव्ही पहिला नाही. सोशल मीडियावर देखील मी ॲक्टिव नव्हते अशी माहिती श्रेयसी देते. इतकेच नव्हे तर फ्रेश होण्यासाठी रोज रात्री एक तास मी वडिलांसोबत फिरायला जात असे अस ती सांगते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in