माजी आमदार डॉमनिक घोन्सालवीस यांचे निधन!

१९८५ साली वसई विधान सभा निवडणुकीत जनता पक्षाचे उमेदवार म्हणून विजयी झालेले डॉमनिक घोन्सालवीस यांनी काँग्रेस उमेदवार, तात्कालीन राज्यमंत्री स्व. तारामाई वर्तक यांचा पराभव करून विधान सभेत कूच केली होती.
माजी आमदार डॉमनिक घोन्सालवीस यांचे निधन!

वसई : वसईचे माजी आमदार, तथा वसई पान मार्केटिंग सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉमनिक घोन्सालवीस यांचे रविवारी बंगली येथील राहत्या घरी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात वसई पान मार्केटिंग सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष रोहन घोन्सालवीस, कार्डिनल ग्रेशर्स हॉस्पिटलचे जनरल सेक्रेटरी युरी घोन्सालवीस आणि ॲलन ही तीन विवाहित मुले, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. सोमवारी सकाळी ९.३० वाजता सेंट थॉमस चर्च, सांडोरमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

१९८५ साली वसई विधान सभा निवडणुकीत जनता पक्षाचे उमेदवार म्हणून विजयी झालेले डॉमनिक घोन्सालवीस यांनी काँग्रेस उमेदवार, तात्कालीन राज्यमंत्री स्व. तारामाई वर्तक यांचा पराभव करून विधान सभेत कूच केली होती. २ मार्च २०२४ रोजी त्यांच्या 'जीवनसंघर्ष' या आत्मचरित्रचे समारंभपूर्वक प्रकाशन करण्यात आले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in