भिवंडीत एकाच जमिनीची दुबार विक्री

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास सपोनि अरुण घोलप करीत आहेत.
भिवंडीत एकाच जमिनीची दुबार विक्री

भिवंडी : २६ जणांनी आपसात संगनमताने भिवंडी सह दुय्यम निबंधक -१ कार्यालयातून विकासकाने खरेदी केलेल्या जमिनीची दुबार विक्री करून विकासकाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी विकासकाच्या फिर्यादीवरून २६ जणांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भगवान हेंदर ठाकूर, शामुबाई ठाकूर, राजेंद्र ठाकूर, सीताबाई ठाकूर, सुनीता ठाकूर, जिवन ठाकूर, अमोल ठाकूर, सुजाता पाटील, जयश्री ठाकूर, सुदर्शन ठाकूर, विजय भोईर, अमर भोईर, अजय भोईर, टिवक उर्फ तुषार ठाकूर, रामा ठाकूर, येसूबाई ठाकूर, शनिदास ठाकूर, रोहित ठाकूर, गौरव ठाकूर, मोहित ठाकूर,चांगुणाबाई मढवी, मिलिंद मढवी, काशिनाथ ठाकूर, सदानंद ठाकूर, सुनील नकुम, हसमुख केशवजी कंझारिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे पिंपळनेर सर्व्हे नं.६९/३ व ६९/५ या जमिनींबाबत मे.सिनीक इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. तर्फे संचालक ओम प्रकाश गोयंका यांच्या तर्फे कु.मु. म्हणून विनोद धरमदास तलरेजा यांच्याशी करारदस्त क्र.९०६५/२००७ हा ४ डिसेंबर २००७ रोजी करण्यात आला होता. मात्र सदर माहीत असतानाही नमूद जमिनींच्या ७/१२ वर सुनील नकुम व हसमुख कंझारीया यांनी इतर २४ जणांची नावे असल्याचे हेरून पैशांचा व्यवहार झालेला असूनही पुन्हा सहदुय्यम निबंधक -१ कार्यालयातून पुन्हा त्याच जमिनीची विक्री करून फिर्यादी विकासक प्रकाश नानाजी पटेल यांच्या मे.भूमी असोशिएट व मे.सिनीक इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.कंपनीचा विश्वासघात करून फसवणूक केली आहे. याप्रकरणी विकासक प्रकाश पटेल यांच्या फिर्यादीवरून २६ जणांवर ५ फेब्रुवारी रोजी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास सपोनि अरुण घोलप करीत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in