अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तरुणास अटक

८ किलो गांजा व कफ सिरफच्या १४० बाटल्या विक्रीसाठी नेणाऱ्या एकास मुंब्रा पथकाने मुंब्य्रातील दत्तूवाडी परिसरातून अटक केली.
अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तरुणास अटक

ठाणे : ८ किलो गांजा व कफ सिरफच्या १४० बाटल्या विक्रीसाठी नेणाऱ्या एकास मुंब्रा पथकाने मुंब्य्रातील दत्तूवाडी परिसरातून अटक केली. अश्रफ रहीम बेग उर्फ डॅनी असे अटक करण्यात आलेल्या अमली पदार्थ तस्कराचे नाव आहे.

मुंब्रा पोलिसांना एक व्यक्ती मुंब्य्रातील दत्तूवाडी येथे अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सापळा लावून अश्रफ रहीम बेग उर्फ डॅनी यास कारमधून ताब्यात घेतले. त्याच्या कारची झडती घेतली असता त्यात ८ किलो गांजा व बंदी घालण्यात आलेल्या १४० कोरेक्स कफ सिरफच्या बॉटल्स आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी या तस्करास वाहनासह ताब्यात घेऊन अटक केली. अमली पदार्थ साठा देखील जप्त केला आहे. अटकेतला तस्कर मालेगाव येथील राहणारा असून तो कारने अमली पदार्थ तस्करी करून मुंब्य्रात आणत असे व मुंब्य्रातील आल्यानंतर मोटारसायकलवरून त्याची विक्री करत असे, अशी माहिती पोलीस तपासातून उघड झाली आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in