रस्त्याच्या अर्धवट कामामुळे एसटी गाड्यांच्या फेऱ्या बंद;स्थानिक आणि विद्यार्थ्यांना फटका

नेरळ-कळंब रस्त्याचे काम अर्धवट असल्याने कर्जत एसटी आगाराने या मार्गावरील एसटी गाड्या बंद ठेवल्या आहेत
रस्त्याच्या अर्धवट कामामुळे एसटी गाड्यांच्या  फेऱ्या बंद;स्थानिक आणि विद्यार्थ्यांना फटका

नेरळ-कळंब राज्यमार्गावरील १५० मीटर रस्त्याचे काम अर्धवट असल्याने या मार्गावरील एसटी गाड्यांच्या अनेक फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. त्याचा फटका ५० हून अधिक गावे आणि आदिवासी पाड्यांमधील विद्यार्थ्यांना तसेच नोकरदारांना बसत आहे. नुकताच या रस्त्यावर प्रशिक्षण बस चालवून चाचणी घेण्यात आली मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूला काम अर्धवट स्थितीत असल्यामुळे एसटीबस ये - जा कररू शकत नसल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले असल्याने स्थानिकांना आणि विद्यार्थ्यांना प्रवासाठी अजून काही काळ वाट पहावी लागणार आहे.

नेरळ-कळंब रस्त्याचे काम अर्धवट असल्याने कर्जत एसटी आगाराने या मार्गावरील एसटी गाड्या बंद ठेवल्या आहेत. नेरळ स्थानकातून कशेळे, शिंगढोळ, नेरळ - गुडवण तसेच कर्जत याशिवाय नेरळ कळंब रस्त्यावरून धावणाऱ्या नेरळ - वारे, नेरळ - कळंब, नेरळ - बोरगाव, नेरळ - ओलमण, नेरळ - मुरबाड तसेच कळंब - वांगणी - कळंब, नेरळ - देवपाडा आणि नेरळ - पोशीर या एसटी गाड्या चालविल्या जातात. कोरोनानंतर एसटी संप मिटल्यावर कर्जत आगाराने नेरळ एसटी स्थानकातून गाड्या सुरु केल्या. मात्र नेरळ - कळंब रस्त्यावर नेरळ धामोते येथे रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे, त्या ठिकाणी रस्त्याच्या एका लेनचे बांधकाम अपूर्ण स्थितीत आहे. त्यामुळे एसटी गाड्यांच्या फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्याचा फटका प्रामुख्याने जून महिन्यापासून स्थानिक विद्यार्थ्यांना बसत आहे.

कर्जत एसटी आगाराचे व्यवस्थापक शंकर यादव यांनी पेण विभागीय कार्यालयाकडून आलेल्या प्रशिक्षण बसने नेरळ एसटी स्टँडची पाहणी करून नेरळ ते दहिवली पुला दरम्यान पाहणी केली. यावेळी त्यांच्या बरोबर सहाय्यक वाहतुक निरीक्षक ज्योतिराम ठोंबरे, महादेव पालवे, देवानंद मोरे, चालक निलेश लांडगे व निलेश भायदे हे होते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in